sd24 news network, provides latest news, Current Affairs, Lyrics, Jobs headlines from Business, Technology, Bollywood, Cricket, videos, photos, live news

ru

Rumble

Click

Thursday, October 10, 2019

अब्बब्बब.... ! मुंबईच्या वंचित आघाडीच्या कार्यालयावर आयकरचा छापा, मिळाली एवढी रक्कम 02

ठळक मुद्दे आयकर विभागाने (आयटी) वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका येथील कार्यालयावर छापा टाकला आहे. छापेमारीत अधिकाऱ्यांना केवळ ११०० रुपये आढळून आले आहे. 

मुंबई - राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांअगोदरच वंचित बहुजन आघाडीमध्ये जागावाटपावरून वादंग निर्माण झाला. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत स्वबळावर लढत आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्यात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आयकर विभागाने (आयटी) वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका येथील कार्यालयावर छापा टाकला आहे. मात्र, छापेमारीत अधिकाऱ्यांना केवळ ११०० रुपये आढळून आले आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका कार्यालयावर आयटीने छापा टाकला. या छाप्यात आयटी अधिकाऱ्यांना ११०० रुपये आढळून आले. दरम्यान आयटीच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर वंचितच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली असा आरोप वंचित आघाडीकडून करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना सूडबुद्धीतून अशी कारवाई करत असल्याचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे खोदा पहाड निकला चूहा अशी आयटीची स्थिती झाली आहे. 
साभार : लोकमत 


Loading...

No comments:

If you haven't seen this then your life is meaningless.

Recent Comments