sd24 news network, provides latest news, Current Affairs, Lyrics, Jobs headlines from Business, Technology, Bollywood, Cricket, videos, photos, live news

ru

Sunday, October 27, 2019

प्रकाश नाग यांचे वंचितांना खुले आव्हान..! 9 प्रश्नांची उत्तरे द्यावी

वंचितांना खुले आव्हान..!
कालचा निकाल लागेपर्यंत वंचित बोलायला तयार झाले नसते हे ठाउक होते म्हणून बोललो नव्हतो. वंचितांनी पुढील प्रश्नांची योग्य ती उत्तरे द्यावीत.

1. बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रमाणे MIM शी युती केली त्याप्रमाणे  BSP, RPI  व इतर आंबेडकरी पक्षांच्या नेत्यांशी युती करण्याचा प्रयत्न केला आहे का?

2. जत, कागल मध्ये RSS च्या उमेदवारांना थेट पाठिंबा! व्वा! तो गोपीचंद पडळकर RSS चा चड्डी बहाद्दर खासदारकीचं तिकीट मागत येतो तुम्ही त्याला तिकीट पण दिला! आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तो पुन्हा वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून थेट स्वगृही म्हणजे RSS पुरस्कृत BJP मध्ये जाऊन बारामतीचा आमदार होण्याची भाषा बोलतो. काय आम्हाला शेंबडे पोर समजता की काय?

3. या निवडणुकीत BJP व शिव सेना  हे मित्र पक्ष म्हणून लढले. निवडणुकीत एकत्र लढण्यासाठी त्यानी युतीला नाव महायुती. पण जिथे जिथे या पक्षांचे उमेदवार उभा राहिले तिथे तिथे त्या पक्षाचे उमेदवार म्हणूनच उभा राहिले. उदा. बीजेपी चे चिन्ह कमळ शिवसेनेचे चिन्ह धनुष्य बाण चंदगड मधून महायुतीचे उमेदवार संग्राम कुपेकर हे होते. पण चंदगडात प्रचार करताना ते शिव सेनेचाच उमेदवार म्हणून प्रचार करत होते, धनुष्य बाण घेऊन! गावागावात शिरताना त्यांच्या गाडीतून "आली शिव सेना शिव सेना" असं गाणे वाजायचे. अगदी त्याच धर्तीवर बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भारिप या स्वतंत्र पक्षाचा प्रसार का केला नाही?

3. बरे असदउद्दीन ओवेसी यांनी MIM या पक्षाचा विलय केला नाही. मग बाळासाहेब आंबेडकरांनी भारिप चा विलय का केला?

4. MIM व भारिप ज्या कारणांसाठी एकत्र आले व ज्या दिवशी एकत्र आले व दोघानी मिळून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली, त्यावेळेपासून आजतागायत कोणीही काहीही लोकाना का सांगितलं नाही ?

5. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर पक्ष स्थापन केला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना ते करणार होते. या दोन्ही नावात जातीय शब्दांचा वापर त्यांनी केला नाही. मग बाळासाहेबांनी वंचित असा जातीयवादी शब्द प्रयोग का केला?

6. मुसलमानांच्याकडे त्यांचा पवित्र असा इस्लाम आहे, पूर्वीच्या अति शूद्रांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म दिला. मग बाळासाहेब तुम्ही पुन्हा या लोकांना वंचित का बनवू पाहता?

7. भीमा कोरेगाव दंगलीचा मास्टर माईंड मनोहर भिडे वर चकार शब्द बोलत नाही उलट ते विद्वान आहेत अशी त्यांची भलावण करता! 

8. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधी ला कधीच महात्मा म्हटले नाही. याऊलट तुम्ही मात्र महात्मा गांधी, आधुनिक भारताचे जनक वगैरे वगैरे म्हणता? काय कारण आहे?

9. नितिन गडकरी ला भावी पंतप्रधान म्हणून आम्हा बौद्धानां सांगता ऐकून आम्हालाच लाज वाटली.

प्रकाश नाग 9380699791


v
Loading...


No comments:

If you haven't seen this then your life is meaningless.

Recent Comments