sd24 news network, provides latest news, Current Affairs, Lyrics, Jobs headlines from Business, Technology, Bollywood, Cricket, videos, photos, live news

ru

Tuesday, October 29, 2019

अपना वतन सोबत संपूर्ण महाराष्ट्रात जनतेच्या प्रश्नांवर जनआंदोलन उभारणार - WPI प्रदेशाध्यक्ष सलीम

मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर अपना वतन संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी दौरा करण्यात येणार आहे.त्याअनुषंगाने शनिवारी दि २६/१०/२०१९ रोजी अपना वतन संघटनेच्या पिंपरी चिंचवड येथील मुख्य कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सुधारणा करणेबाबत तसेच स्वामिनाथन आयोग व शेतकरी उत्पादनाच्या दीडपट हमीभाव, शेतकरी आत्महत्या , पिण्याचे शुद्ध पाणी, रोजगार,अल्पसंख्यांकांवरील अन्याय, संत तुकाराम महाराज यांची साक्षात्कार भूमी भामचंद्र व भंडारा डोंगर संरक्षित करणे,महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी, नदीजोड प्रकल्प ,पर्यावरण ,अमली पदार्थांच्या विक्री व उत्पनावर नियंत्रण,गड किल्ले संवर्धन यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यावेळी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.सलीम शेख,अपना वतन चे संस्थापक सिद्दीकभाई शेख,सचिव दिलीप गायकवाड,WPI  चे पुणे जिल्हा अध्यक्ष जावेद सौदागर,जितेंद्र जुनेजा, हमीद शेख,अस्लम शेख,हाजीमलंग शेख,संतोष शिंदे,सालार शेख, जावेद सहा यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मा. मजहर शेख (प्रसिद्धिप्रमुख ,अपना वतन संघटना, महा. राज्य )


Loading...


No comments:

If you haven't seen this then your life is meaningless.

Recent Comments